fbpx

चोपड्यात लोडशेडिंग विरोधात शिवसेनेचा मोर्चा

Shivsena

जळगाव: चोपडा शहर व तालुक्यात मोठय़ा प्रमाणात होणारे विजेचे भारनियमन आणि त्यात विजेच्या वाढीव बिलाची आकारणी या विरोधात तालुका शिवसेनेतर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता येथील वीज वितरण कंपनीच्या (अर्बन) विभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.म्युनिसिपल हायस्कूल शेजारील कार्यालयापासून तर मेनरोड मार्गे गुजराथी गल्लीतील हेडगेवार चौकातील वीज वितरणच्या विभाग 1 कार्यालयावर नेण्यात आला.

यावेळी तालुक्यातील विजेचे होणारे भारनियमन रद्द करा आणि वाढीव बिल कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता व्ही. बी. सोनवणे यांना देण्यात आले. त्यासोबतच त्यांना रॉकेलवर चालणारी एक लहान चिमणी (दिवा) ही भेट देण्यात आली. मोर्चात माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, नगरसेवक किशोर चौधरी, शिवसेनेचे गटनेते महेश पवार, पंचायत समितीचे उपसभापती व्ही. एम. पाटील, राजाराम पाटील, महेंद्र धनगर, दीपक चौधरी, दीपक जोहरी, राजेंद्र बेटवा रमेश राजपूत, शरद पाटील, प्रवीण जैन, महेंद्र भोई यासह शेकडो शिवसैनिक व महिला पदाधिका-यांचा समावेश होता.

1 Comment

Click here to post a comment