fbpx

पिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर

udhav thakare

टीम महाराष्ट्र देशा: पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात येणार आहे. बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून मोर्चाला सुरुवात होणार असून विमा कंपन्यांवर हा मोर्चा धडक घेईल. उद्धव ठाकरे सुरुवातीपासून मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यानंतर त्यांची जाहीर सभाही होणार आहे.

शिवसेना सत्तेत सहभागी असताना देखील रत्यावर उतरत असल्याने उद्धव ठाकरे यांना नेमक काय दाखवायचं आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान पीक विमा योजना चांगली आहे, मात्र योजनेचा लाभ तळगाळात पोहचत नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हा इशारा मोर्चा निघणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं.