fbpx

‘भाजप आमचं पाव्हणं’ ; शिवसनेने भाजप कार्यालयात सोडले जनावरं

औरंगाबाद : ‘चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन ठेवा’ असा अजब सल्ला देणारे भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्याविरुद्ध शिवसेनेने आज औरंगाबादेत अनोखे आंदोलन केले. भाजपच्या मंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे चारा नाही. भाजप आमचं पाव्हणं आहे. त्यामुळे आम्ही आमची जनावरे भाजपच्या कार्यालयावर घेऊन निघालो आहोत, असे म्हणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमवेत असलेले शिंदे हे पथक जिल्ह्याबाहेर गेल्यानंतर पाथर्डी येथील विश्रामगृहावर आले होते. तेथे काही शेतकरी त्यांना भेटायला आले होते. दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती, पण शहरी भागात अशा छावण्या सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे सांगताना शिंदे यांनी पाहुण्यांकडे (नातेवाईक) जनावरे नेऊन घालण्याचा सल्ला दिला.

दरम्यान ‘चारा नसेल तर जनावरं पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा,’ असा अजब सल्ला देणारे अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील उद्या जनावरं नेऊन निषेध नोंदवणार आहेत.