शिवसेना पक्षप्रमुख मराठवाडा दौऱ्यावर

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ९ जानेवारी पासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागांची पहाणी करणार आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्वपूर्ण व लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेना पक्ष मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पहाणी करून दुष्काळग्रस्तांसाठी विशेष मोहीम राबवणार आहेत.

या आधी देखील उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला होता. त्यावेळी दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तेथील शिवसैनिकांच्या भेटी घेतल्या होत्या. त्याचबरोबर लोकसभा आणि विधान सभेवर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या होत्या.

You might also like
Comments
Loading...