बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

narendra modi with udhav thakary

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नालाच आता सुरुंग लावण्याचं ठरवले आहे. शिवसेनेने बुलेट ट्रेनला जोरदार विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला असून या मोर्चाला शिवसेनेने पाठींबा दिला असून उद्धव ठाकरेही या मोर्चात सहभागी होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बुलेट ट्रेन विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी समितीची भूमिका जाणून घेत त्यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीच्यावतीने येत्या ३ जून रोजी पालघरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला असून पालघरमध्ये रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.