राणेंच्या मंत्रिपदाला शिवसेनेचा ब्रेक; मंत्रीपद दिल्यास गंभीर विचार करणार- शिवसेना

narayan rane and udhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस पक्षाला रामराम करून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीला शिवसेनेकडून ब्रेक लावण्यात आल्याच वृत्त आहे. तसेच शिवसेनेच्या विरोधानंतरही राणे यांना मंत्रिमंडळात प्रवेश दिल्यास गंभीर विचार करावा लागेल, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याच वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.

नारायण राणे आणि शिवसेनेमधील वाद महाराष्ट्राला काही नवीन नाही. राणे यांनी नवा पक्ष स्थापन करत एनडीएला पाठींबा दिला आहे, यामुळे गेल्या काही काळात त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याच सांगण्यात येत आहे. मात्र आता शिवसेनेकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे बघाव लागणार आहे.