हडपसरमधील कचरा प्रकल्पा विरोधात शिवसेनेचा जागर

shivsena hadapsar

पुणे :पुण्यातील कचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत . रामटेकडी हडपसर परिसरात महापालिके तर्फे उभारण्यात येणाऱ्या कचरा प्रकल्पाला विरोध म्हणून शिवसेनेच्या आज वतीने जनजागृती पदयात्रा व महाजागर करण्यात आला. यावेळी पालिका प्रशासन तसेच सरकारी धोरणांचा निषेध करण्यात आला .

shivsena hadapsar 1

हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने ७०० टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जात आहे. भाजप वगळता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा या प्रकल्पास विरोध आहे . या प्रकल्पा विरोध दर्शवण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग येथून पदयात्रेस सुरुवात करून पदयात्रेचा समारोप हडपसरमधील गांधीचौकात करण्यात आला . सत्ताधाऱ्यांना सबुध्दी मिळो, चौकातच आदिशक्तीचा जागर घालण्यात आला.स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही रामटेकडी येथे बायो एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड हा कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सत्ताधारी भाजप ठाम आहे. शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या सभागृहात व स्थानिक पातळीवर कायम विरोध केला आहे.