भद्रावती नगरपरिषदेवर सेनेचा भगवा

shivsena flag

चंद्रपूर : भद्रावती नगरपरिषदेवर शिवसेनेनं पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. भद्रावती नगरपरिषदेसाठी रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळाल्याने दहा वर्षांपासून असलेली सत्ता राखण्यात यशस्वी ठरली आहे.

Loading...

केंद्रीय गृहराज्यमंञी हंसराज अहीर यांनी विजय मिळविण्यासाठी मोठी शक्ती लावली होती मात्र तरीही सेना भद्रवातीचा गड राखण्यात यशस्वी ठरली. नगरसेवक पदाच्या 27 जागापैकी 16 जागा शिवसेनेनं तर चार जागा भाजपने जिंकल्या आहे काँग्रेसला दोन तर भारिप बहुजन महासंघाचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाळु धानोरकरांचे बंधू असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर विजयी झाले असून त्यांनी आठ हजार मतांनी भाजपचे सुनिल नामोजवार यांचा पराभव केला.

भद्रावती नगर पालिका निवडणूक निकाल :

शिवसेना- 16

भाजप- 4

भारीप- 4

काँग्रेस- 2

अपक्ष- 1

एकूण- 27

लोकसभा निवडणुकांआधी भाजपला धक्का, आणखीन एका मित्रपक्षाचा रामरामLoading…


Loading…

Loading...