तुमचा पंतप्रधान, आमचा मुख्यमंत्री, युतीसाठी सेनेची नवी अट

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएत असणारे पक्ष त्यांच्या राज्यात भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे तुमचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांना द्या, अशी थेट मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीबाबत गेल्या काही दिवसांपर्यंत अनिश्चितता होती पण आता युती नक्कीच होणार असल्याच स्पष्ट होत असताना सेनेकडून ही नवी अट ठेवण्यात आली आहे.

‘एनडीएनं 2019 मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यात शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात अतिशय भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाला जर केंद्रात मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांसाठी सोडावं,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Loading...

दरम्यान मधल्या काळात शिवसेना आणि भाजप यांच्या युती बाबत अस्पष्टता होती. तर शिवसेना ही नेहमीच सरकारमध्ये असून देखील भाजपच्या विरुद्ध भूमिका घेत असे. शिवसेना ही त्यांच्या तत्वांवर ठाम असल्याने या विरोधी भूमिकेत असल्याच शिवसेनेकडून सांगण्यात येत होत. पण आता निवडणुकींच्या रणधुमाळीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांची मदत घेणार असल्याच दिसत आहे.

दरम्यान,राज्यात मोठा भाऊ आपणच आहोत अशी वक्तव्य करून जास्त जागा पदरात पडल्या तरच शिवसेना भाजपबरोबर युती करेल असे संकेत शिवसेनेचे नेते देत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून मात्र जागावाटपाची चर्चा पूर्ण झाले असून फॉर्म्युलाही निश्चित झाला असल्याची माहिती अनधिकृतपणे माध्यमांना दिली जात आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील