राधाकृष्ण विखे पाटील हे एक नंबरचे लबाड आणि स्वार्थी

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील हे एक नंबरचे लबाड आणि स्वार्थी आहेत. रिफायनरी प्रकल्प म्हणजे सेना-भाजप यांची मॅच फिक्सिंग असल्याचा जावई शोध त्यांनी लावला आहे. त्यांची राजकीय कारर्किदच फिक्सिंगमध्येच गेली आहे. काँग्रेसच्या काळात झालेले गैरव्यवहार दाबण्यासाठीच त्यांची भाजपशी झालेली फिक्सिंग सर्वांना माहित आहे. त्यांनी आपले काळे मांजर आडवे आणू नये, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील लगावला आहे.

दरम्यान, नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते. पण हा प्रकल्प भारतीय कंपनीचा नसून सौदी अरेबियातील कंपनीच्या हितासाठी हा प्रकल्प कोकणात आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.