fbpx

लोक सोनिया गांधींना भेटतात, आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर काय बिघडलं ?

टीम महाराष्ट्र देशा : सोमवारी दिल्लीतल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. आता या भेटीवरून चांगलच राजकारण तापायला सुरवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या भेटीची खिल्ली उडवली आहे.

लोक दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतात. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोघेही पंढरपुरात गेले आणि विठ्ठलाची भेट घेतली तर बिघडलं कुठे? अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी सोनिया गांधींची जी भेट घेतली त्यावर टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आषाढीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा करणार आहेत असं माहिती आहे. यावर संजय राऊत यांनी आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर काय बिघडलं? असा राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीच्या आठवणी जागवल्या. इंदिरा गांधी या आक्रमक होत्या, त्यांनी देश घडवला. शिवसेना बंद करण्याचा घाट काहीजणांनी घातला होता तो त्यांनी हाणून पाडला. या सगळ्या प्रसंगाचे साक्षीदार आम्ही आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.