fbpx

विरोधक मनसेलाचं नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांनाही सोबत घेतील – राऊत

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप – शिवसेनेला पायउतार करण्यासाठी कॉंग्रेसकडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी हालचाल केली जात आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने कॉंग्रेस आघाडीत मनसे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राज्यातील विरोधी पक्ष केवळ कागदावर उरलेला असून विरोधक मनसेलाच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही सोबत घेतील. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेनेच्या पीकविमा मोर्चावर विरोधक टीका करत आहेत, मात्र राज्यातील विरोधी पक्षावर जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. विरोधी पक्ष कुचकामी बनले आहेत. त्यांनी आमच्यावर टिका करण्यापेक्षा मोर्चा का काढला नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तसेच आजवर शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाविषय लढत आली आहे. या पुढे देखील लढत राहील, असंही ते म्हणाले.