‘एकट्या भाजपमध्येही मतभेद, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद साहजिकच’

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ‘एकट्या भाजप सरकारमध्येही मतभेद होते, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद असणं साहजिक आहे. परंतु सरकारला त्याचा कोणताही त्रास किंवा अडचण नाही,’ असे राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री ठाकरे सरकारचं नेतृत्व करत आहेत. एनपीआरबाबत तीन पक्षांमध्ये वेगळी भूमिका असली, तरी मतभेदाचा सरकारला त्रास नाही. एका पक्षाचं सरकार असलं, तरी मतभेद असतात. भाजप सरकारमध्येही विरोधाचा सूर उमटत होता. हे तर तीन पक्षाचं सरकार आहे,’ असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

Loading...

पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘कोण वारिस पठाण? त्यांना विनाकारण महत्त्व दिलं जात आहे. 15 कोटी सोडा, त्यांच्यामागे 15 लोकं येऊ द्या, त्यांचा मी सत्कार करेन’ असा टोला एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना राऊत यांनी लगावला.

दरम्यान, ‘उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये जी चर्चा होते, ती राज्याच्या विकासाबाबत होते, योजना, रखडलेल्या कामांविषयी होते. तशी चर्चा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये होणार आहे,’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश