‘पैसे बँकेत ठेवले तर नीरव मोदीची भीती आणि घरी ठेवले तर नरेंद्र मोदींची भीती’

संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा- ‘पैसे बँकेत ठेवले तर नीरव मोदीची भीती आणि घरी ठेवले तर नरेंद्र मोदींची भीती’ असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीवरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला असून ईडीनेही चौकशी सुरु केली आहे. पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणातील नीरव मोदी हा मुख्य सूत्रधार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यावर प्रतिक्रिया दिली. ‘बँकेत पैसे ठेवले नीरव मोदीची भीती आणि घरात ठेवले तर नरेंद्र मोदींची भीती’ असे ट्विट त्यांनी केले.