‘आम्ही सत्तेचा कमरपट्टा लावून आलो आहोत, आमची सत्ता आता जाणारच नाही’

टीम महाराष्ट्र देशा : ‘आम्ही सत्तेचा कमरपट्टा लावून आलो आहोत, आमची सत्ता आता जाणारच नाही. जे माझ्या अंगावर येतात ते माझं काहीच वाकडं करू शकत नाहीत, मी फाटका माणूस आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

ते नाशिकच्या महाकवी कालिदास मंदिरात राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलखतीत संजय राऊत यांनी रोखठोक उत्तरे दिली. उर्जा युवा प्रतिष्ठानने या मुलाखतीचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘देश पुन्हा तुटेल असं वाटत आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Loading...

तसेच ‘शरद पवार यांना ईडीची नोटीस आली तेव्हाच माझ्या डोक्यात पहिली ठिणगी पडली होती. 2014 ला भाजप सरकार आलं होतं तेव्हा आम्ही स्वागत केलं. मात्र त्यानंतर लोकशाही धोक्यात जात असल्याचं बघायला मिळत होतं. देश पुन्हा तुटेल असं वाटत आहे,’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली. ‘माझा फोन टॅप केला तर त्यांना कळेल संजय राऊत किती उत्तम शिव्या देतात. मी ज्यांच्याविषयी बोलत होतो, तेच ऐकत असल्याने त्यांना कळलं आम्ही काही मागे हटत नाही.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?