राधाकृष्ण विखे पाटील हे कोणत्या पक्षात जावे या द्विधा मनस्थितीत – संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे कोणत्या पक्षात जावे या विचारात असून ते सध्या व्दिधा मन:स्थितीत आहेत. असा टोला शिवसेनेचे खासदार संजय यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात शिवसेना कार्यकर्ता संमेलनात बोलत होते.

दरम्यान, मध्यंतरी राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याने विखे पाटील भाजप मध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या त्याच अनुशंघाने खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.