आमची मोर्चेबांधणी आणि तटबंदी काय असते याची भाजपला चांगली कल्पना – संजय राऊत

आमची मोर्चेबांधणी आणि तटबंदी काय असते याची भाजपला चांगली कल्पना – संजय राऊत

sanjay raut - bjp

मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसापासून भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय. राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते दिल्ली मुक्कामी आहेत आणि गुप्त भेटी घेत आहेत. काल या भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विरोधात मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय झाला आहे.

भाजपच्या या बैठकीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोर्चेबांधणी हे शब्द बोलायला सोपे आहेत. आमची मोर्चेबांधणी आणि आमची तटबंदी काय आहे याची कल्पना त्यांना आहे, जनता 2024 च्या निवडणुकीची वाट पाहत आहे. त्यावेळी जनता कुणाला आशीर्वाद देणार ते दिसेलच’, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, दुसरीकडे 102व्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. फडणवीसांना कायद्याचे पेच जास्तच माहीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिलीचाही सल्ला घेऊ, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या