आता भाजपनं आमचा मुका घेतला तरी युती होणार नाही – संजय राऊत

raut-sanjay

टीम महाराष्ट्र देशा : भाजपनं आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही, अस वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपनं सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले आहेत, मात्र शिवसेनेकडून स्वबळाची भाषा वापरत भाजपला डिवचण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे, आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

बलात्कार, जातीयद्वेष यामुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेलं एकंदरीत वातावरण हे भ्रमनिरास करणारं असल्याचं सांगत; त्यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय, जिथे पक्षाचा स्वाभिमान दुखावला जाईल, ती पदं आपण स्वीकारणार नसल्याचं सांगत संजय राऊत यांनी राज्यसभा उपसभापतीपदाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला.