‘प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय’

‘प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय’

Sanjay Raut and Gopichand Padalkar

मुंबई: परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा केली. या संपातून तोडगा काढण्यासाठी, एसटी कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळावं म्हणून एक छान पॅकेज दिलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संदर्भातील माहिती काल पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

एसटी कामगारांचे सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकारने अनेक प्रयत्न केल्याचे दिसत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत एसटी कामगारांच्या पगारवाढी बद्दल देखील जाहीर करण्यात आले आहे. या सर्व मुद्यांवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. या विषयी बोलताना त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चांगलाच निशाण साधला आहे.

राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसून सुद्धा पॅकेज देण्यात आलं आहे. कामगार समजूतदार आहेत.महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल त्या कामगारांसमोर, मीडियासमोर एकेरी उल्लेख करता तुमचं कतृ्त्व काय आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. कामगारांचे नेते संप चिघळवत असतील तर ते कामगारांसाठी चांगलं नाही, असंही संजय राऊत म्हणाले. संप सुरु करणारे दोन्ही नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आंदोलन थांबवायचा निर्णय घेत असतील तर कुठं थांबायचं हे त्यांना समजत असेल तर त्यांचं स्वागत करतो, असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: