fbpx

कोल्हापूरचा स्वाभिमान डिवचल्यास काय होतं ते शरद पवारांनी ध्यानात ठेवाव – खा. संजय मंडलिक

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. कोल्हापूरचा स्वाभिमान डिवचल्यास काय होतं ते शरद पवारांनी ध्यानात ठेवाव. असे खासदार संजय मंडलिक यांनी म्हंटले.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, संजय मंडलिक यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. शरद पवार यांनी २००९ मध्ये कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचला तर काय होतं याचा अनुभव घेतला होता. मात्र त्यातून बोध घेण्याएवजी यावेळी देखील पवारांनी जिल्ह्याच्या स्वाभिमानाला हात घातला. असे संजय मंडलिक यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी या लोकसभेला इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. कोल्हापूर आता युतीचा बालेकिल्ला बनला आहे. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर, येत्या विधानसभेला जिल्ह्यातील सर्व जागांवर युतीचे उमेदवार निवडूण येतील, असा दावाही त्यांनी केला.