ही जादूची झप्पी नाही तर मोदींसाठी मोठा धक्का आहे – संजय राऊत 

sanjay raut1

टीम महाराष्ट्र देशा : राहुल गांधी हे खऱ्या अर्थाने राजकीय झालेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार झटका दिलाय. ही जादूची झप्पी नव्हती तर ती मोदींसाठी मोठा धक्का आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

लोकसभेत काँग्रेसकडून प्रश्न नाहीत तर देशातून लोक मोदींना प्रश्न विचारत आहेत. त्यांना जाब विचारत आहेत. राहुल गांधी यांनी जे केले ते योग्य आहे. राहुल एक परिपक्व नेता आज पाहायला मिळालेत, असे देखील संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, दरम्यान , मोदी सरकार विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर  लोकसभेत मतदान झालं. यामध्ये कायम एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे सत्ताधारी आणि विरोधक आपण कायम पाहतो. मात्र, सभागृहात आपल्या भाषणातून सरकारचे वाभाडे काढल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. या भेटीवर उलट सुलट चर्चा रंगल्या असताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलं आहे.