एल्फिन्स्टन स्टेशनच्या पुलावरील चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे एका बाजूला शॉक व्यक्त केला जात आहे. तर आता एक गंभीर बाब समोर आली असून यामुळे सर्वांचाच संताप होईल. कारण ज्या पुलावर हि घटना घडली त्या पुलाची रुंदी वाढवण्याबाबत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी 23 एप्रिल 2015 रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहिलं होतं. मात्र निधी नसल्याचं कारण देत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या पत्रांकडे दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे वेळीच या पत्राची दाखल घेतली गेली असती तर कदाचित आजची दुर्घटना टाळता आली असती.
शेवाळे यांच्याप्रमाणे खासदार अरविंद सावंत यांनीही फेब्रुवारी 2016 ला यासंदर्भातच पत्र लिहिलं होतं. मात्र त्यावेळीही दखल घेण्यात आली नाही असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तसेच दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे.