निवडणुकीत दानवेंनी जे केलं ते माझ्या जीवाला लागलं : चंद्रकांत खैरे

टीम महाराष्ट्र देशा : माझा देवावर विश्वास आहे. आणि देवाचा आशीर्वाद माझ्यावर आहे त्यामुळे मी निवडून येणार आहे. असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. तसेच रावसाहेब दानवे यांच्याकडून निवडणुकी दरम्यान जे काही झाले ते मनाला लागले आहे. युतीमध्ये असतांना या गोष्टी व्हायला नको होत्या. असेही खैरे यांनी म्हंटले.

साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. विशेष म्हणजे माध्यमांच्या एक्झिट पोल नुसार चंद्रकांत खैरे विजयी होणार असल्याचे दिसून आले आहे. याचदरम्यान चंद्रकांत खैरे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी, माझा देवावर विश्वास आहे. आणि देवाचा विश्वास माझ्यावर आहे त्यामुळे मी निवडून येणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading...

याचबरोबर, लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांचे जावाई तुमच्या विरोधातील उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना मदत केली असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांना विचारले असता, निवडणुकी दरम्यान जे काही झाले ते मनाला लागले आहे. युती मध्ये असतांना या गोष्टी व्हायला नको होत्या अशी माझी भावना होती. त्यांच्या त्या गोष्टीमुळे त्यांना त्यांचे पक्षश्रेष्ठी पाहतील असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, निकाल लागेपर्यंत चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद मधील भद्रा मारोती मंदिरात यज्ञ सुरु केला आहे. आणि निकाल लागे पर्यंत तसाच सुरु राहणार आहे. तसेचं या यज्ञाच्या ठिकाणी मारोतीच्या दर्शनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा येणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे येऊन गेल्याचे त्यांनी म्हंटले.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघामध्ये गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेने भगवा फडकावला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. २००४ लोकसभा निवडणुकी पासून चंद्रकान खैरे यांनी औरंगाबादमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला आहे. यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे सुभास झांबड, तर वंचित बहुजन आघाडी कडून इम्तीआज जलील, तसेच अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव रिंगणात होते. चंद्रकांत खैरे यांना यंदाची निवडणूक चांगलीच आवघड घेली असून. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान विविध माध्यमांच्या आणि महाराष्ट्र देशाच्या एक्झिट पोल नुसार औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून चंद्रकांत खैरे यांनी आपली जागा कायम ठेवली असल्याचे दिसून आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली