‘पाकिस्तान मुर्दाबाद’ कुलभूषण जाधव प्रकरणी शिवसेनेन दणाणून सोडली संसद

shivsena mp arvind sawant

टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तानच्या कैदेत असणारे कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या वागणुकी विरोधात आज लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.

कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीने २५ डिसेंबरला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटी दरम्यान कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकली काढायला लावली तसेच मराठी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. दरम्यान हि भेट देखील एका बाजूला कुलभूषन जाधव तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई – पत्नी आणि मध्ये काच अशा प्रकारे झाली. यामुळे भारताकडून या सर्व गोष्टींचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

आज संसदेच कामकाज सुरु होताच खासदार अरविंद सावंत आक्रमक झाले आणि ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधकांनीही सावंत यांच्या सुरात सूर मिसळत जोरदार घोषणाबाजी केली.