शिवसैनिकांनाच नकोय महाशिवआघाडी : उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरून शिवसैनिक नाराज

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजपने दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप शिवेसेनेने केला. त्यानंतर निवडणुकीत दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेलाही बहुमत सिध्द न करता आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता शिवसेनेने भाजपासोबत युतीची चर्चा बंद करुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु केली आहे.

अशातच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. जेव्हा शिवसेना आमदार फुटू नये, यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना जवळपास पाच ते सहा दिवस रिट्रिट हॅाटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांना भेटण्यासाठी रिट्रिट हॅाटेलमध्ये गेले असताना त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

” निवडणुकीत ज्या पक्षांच्या विरोधात आपण आवाज उठवला, टीका केली आणि आता त्याच पक्षांसोबत आघाडी स्थापन करायची, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विश्वास नसल्याचे देखील आमदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितले.

यावर शिवसेनेने अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत घेतलेली भूमिका आमदारांना फारशी पटली नसल्याचं यावरून दिसत होते. तसेच अनेक दिवसांपासून आमदारांना हॅाटेलमध्ये मुक्कामी ठेवल्याने अजून किती दिवस आम्हाला हॅाटेलमध्ये ठेवणार असा सवाल देखील उद्धव ठाकरेंसमोर उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या :