भुजबळांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे ऋण फेडण्याची वेळ आली- शिवसेना आमदार

भुजबळांसाठी सर्वांनी एकत्र लढण्याची गरज- शिवसेना आमदार

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ वाचा फोडण्यासाठी सर्वांनी एकत्र होऊन लढणे आवश्यक असल्याचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आ. राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. तसेच छगन भुजबळ यांनी जिल्ह्याच्या विकासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे ऋण फेडण्याची आज वेळ आली असून त्यांच्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आ.राजाभाऊ वाजे यांच्या निवासस्थानी अन्याय पे चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.वाजे पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यावरील अन्याय हा समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहाविण्यासाठी अन्याय पे चर्चा हा अभिनव उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वांनी पक्षभेद जातीभेद विसरून एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. तसेच छगन भुजबळ यांनी जिल्ह्याच्या विकासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे ऋण फेडण्याची आज वेळ आली असून त्यांच्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात विविध विकासकामे केले असून त्यांचे ऋण फेडण्याची ही वेळ असून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वांनी एकसंघ होण्याची गरज असल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

You might also like
Comments
Loading...