खुर्चीच्या धुंदीत रंग बदलणाऱ्या राणेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज – शिवसेना आमदार

कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या आमदारांची संख्या शून्यावर आणणार असल्याची गर्जना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी थेट कोल्हापूरमध्येच केली आहे. आता यावर शिवसेनेकडून तेवढीच जोरकर टीका करण्यात आलीय.

शिवसेनेच्या कृपेने अनेक पदे राणेंनी भोगली आहेत. त्यांच्या सभेत कोल्हापूरमधील पाचशे लोकही नसतील सगळे लोक मुंबई मुंबई पुणे येथून आणले होते. त्यामुळे विचलित झालेल्या राणेंनी कोणाची तरी लाचारी पत्करून शिवसेनेवर टीका केलीय. खुर्चीच्या धुंदीत सरड्याप्रमाणे रंग बबदलणाऱ्या नारायण राणेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचे पत्रक शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्ध केले आहे. तसेच जी व्यक्ती खाल्ल्या मिठाला जागला नाही, त्याला शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नसल्याच या पत्रकात म्हंटल आहे.

 

You might also like
Comments
Loading...