फोडाफोडीचे राजकारण सुरूच; भाजप प्रवेशासाठी चंद्रकांत पाटलांनी 5 कोटींची ऑफर दिली : जाधव

टीम महाराष्ट्र देशा : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला ५ कोटींची ऑफर दिल्याचा गोप्यस्फोट शिवसेनेचे कन्नड मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार ‘गेल्या महिन्यात एका भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी माझ्यासह 25 आमदारांना भाजप प्रवेशासाठी पैशांची ऑफर दिल्याचं’ आमदार जाधव यांनी सांगितलं आहे.

राज्य सरकारमध्ये सहभागी असणारी शिवसेना भाजपवर निशाना साधण्याची एकही संधी सोडत नाही. यामुळे त्रस्त्र झालेल्या भाजपकडून सर्वच शिवसेना आमदारांना अशा प्रकारे ऑफर दिली जात असल्याचा अंदाज देखील हर्षवर्धन जाधव यांनी वर्तवला आहे. तसेच ‘पक्षात आल्यास निवडणुकीचा खर्च भाजपाकडून करण्यात येईल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले असल्याच त्यांनी सांगितल आहे.

 

 

You might also like
Comments
Loading...