औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ केव्हा होणार शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या वचनाचा विसर

चंद्रकांत खैरे यांचा शिवसेनेला घराचा आहेर

औरंगाबाद: स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा सांगितलं होतं की औरंगाबाद नाही तर संभाजी नगर म्हणा या औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणार पण गेली अनेक वर्षे झाली पण औरंगाबादचे नामकरण झालेले नाही यावर शिवसेना उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना नेत्यांनाच कानपिचक्या दिल्या आहेत
शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याची घोषणा शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मात्र, शिवसेना मंत्र्यांनाच त्याचा विसर पडला आहे. अशा शब्दांत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. नामकरणाच्या कामात भाजपची मोठी अडचण होतेय, असा आरोपही खैरेंनी केला आहे.

bagdure

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत गंभीर नसून ते केंद्रात प्रस्ताव पाठवत नसल्याचे खैरेंनी यावेळी सांगितले. सातत्याने पाठपुरावा केला. अनेक पत्र लिहिली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे खैरेंनी सांगितले.

शिवसेनेचे मंत्रीही लक्ष घालत नाहीत. औरंगाबादच्या नामकरणाच्या कामात शिवसेनेचे मंत्रीही लक्ष घालत नसल्याचे सांगत खैरेंनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राज्यात आणि केंद्रात एनडीएचे सरकार आहे. नामकरणाची प्रक्रिया करणे सहज शक्य आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या तीन वर्षात त्यासाठी चार पत्र लिहिली आहेत. ते केवळ ‘आपण करु’, एवढेच उत्तर देतात, असे खैरेंनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...