शिवसेना मंत्र्यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवाराचा तब्बल १ लाख मतांनी विजय

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शिवसेना मंत्री विजय शिवतारे यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवार झंखाना पटेल या 1 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत, झंखाना यांना 1 लाख 73 882 मते तर कॉग्रेसचे योगेश पटेल यांना 63 हजार 63 मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार अरविंद राजपूत यांना केवळ 1104 मते मिळाली आहेत. दरम्यान शिवतारे शिवसेना मंत्री असतानाही एका भाजप उमेदवारासाठी प्रचार केल्याने राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

राज्य सरकारमध्ये भाजप – शिवसेना दोघेही सत्तेत सहभागी असताना देखील त्यांच्यातून विस्तव जाताना दिसत नाही. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याच चित्र गुजरात विधानसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळाल होते. गुजरातमध्ये शिवसेनेकडून 47 उमेदवार उभे करण्यात आले. मात्र अस असल तरीही राज्यातील शिवसेनेचे मंत्री सूरतमध्ये जाऊन भाजप उमेदवाराचा प्रचार करत असल्याने मोठी चर्चा झाली. झंखाना या भाजपाचे दिवंगत आमदार राजा पटेल यांची मुलगी आहे. दरम्यान या सभेसाठी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजय शिवतारे यांनी ‘ दिवंगत राजाभाई पटेल हे आपले मित्र होते. मुंबईत काहीकाळ आम्ही एकत्र घालवला. तसेच आम्ही दोघांनी राजकारणात एकत्र प्रवेश केल्याच त्यांनी सांगितले. तसेच आपल्या पक्षाकडून आलो नसल्याच यावेळी शिवतारे यांनी सांगितले होते.

You might also like
Comments
Loading...