fbpx

शिवसेना मंत्र्याचा पराभव, रायगडमध्ये सुनील तटकरेंचा विजय

टीम महाराष्ट्र देशा :साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले होते. ही प्रतीक्षा संपली असून, रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरे यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे मंत्री अनंत गीते यांचा त्यांनी पराभव केला आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री अनंत गीते यांच्यात लढत होती. २०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांनी विजय मिळवला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत अनंत गीतेना विजय मिलाब्ने अवघड गेले आहे.

सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा २१ हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे. आतापर्यंत राष्ट्रदीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे १ लक्ष ५७ हजार मतांनी विजय मिळवला आहे. तर रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरे यांनी २१ हजार मतांनी विजय मिळवला आहे.