नडलेल्यांच्या मदतीला धावणारा ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’

दवाखान्याची पायरी चढायची म्हणल तरी भल्याभल्यांणा धडकी भरते. कारण साधा सर्दी-खोकला जरी असला तरी चारशे-पाचशे रुपयांना कात्री लागणार हे ठरलेल असत, मग अशातच ह्रदयविकार अथवा इतर दुर्धर आजारची लागण झाल्यास संबंधित व्यक्तीच संपूर्ण कुटुंबच हादरून जात. अशामध्ये मध्यमवर्गीय आणि गरिबांचे कंबरडे मोडून जाते. जिथे दररोजच्या खाण्याची चणचण निर्माण होते तिथे लाखो रुपयांची मेडिकल बिले कशी भरणार असा मोठा प्रश्न सामन्यांपुढे पडतो. अनेकवेळा आर्थिक अडचणींमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागल्याच पहायला मिळाल आहे.

रुग्णाला वेळीच योग्य उपचार मिळाल्यास कोणत्याही आजारावर मात करता येते. पण पैसे नसल्यास हॉस्पिटलकडून देखील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक केली जाते. वैद्यकीय उपचारासाठी अनेक सरकारी योजना आहेत. मात्र, अनेकवेळा या योजना म्हणजे केवळ पांढरा हत्तीच असल्याच दिसून आल आहे. तसेच सरकारी योजनांचा नेमका लाभ करा मिळवायचा याची माहितीच बहुतांश लोकांना नसते. अशाच नडलेल्यांचा मदतीला ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ धावून आला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील कोपरी येथे असणाऱ्या कार्यालयामधून हा मदत कक्ष चालवला जातो.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून रुग्ण आणि सरकारी विभाग, धर्मादाय ट्रस्ट, विविध संस्था यांच्यामध्ये समन्वय घडवून आणला जातो. यासाठी खास वैद्यकीय सहायकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे, मागील सहा महिन्यांमध्ये रुग्णांना दीड ते दोन कोटीं रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात वैद्यकीय कक्षाने मदत केली आहे. येत्या महिन्यामध्ये मोफत हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन केले जाणार असून यामध्ये २५ हजार नागरिकांची तपासणी करण्याचे ध्येय वैद्यकीय कक्षाकडून ठेवण्यात आले आहे.

संपर्कासाठी पत्ता
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय
कोपरी, मंगला हायस्कूल शेजारी,
विजय स्नक्स समोर , ठाणे ( पूर्व )
संपर्क: ०२२-२५३२२५६७

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...