शिवसेनेने नैतिकता गमावली : राधाकृष्ण विखे-पाटील

शिवसेना सत्तेसाठी लाचार

शिर्डी : शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यामध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. ज्यांनी नैतिकता गमावली, त्यांनी स्वबळावर लढण्याच्या गप्पा मारू नये, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

आज शिवसेनेच्या बैठकीत आदित्य ठाकरेंना नेतेपद बहाल करण्यात आले. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेना देशातील सर्व राज्यात निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयावर विखे-पाटील यांनी शिवसेनेवर हल्ला करत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. शिवसेनेने नैतिकता गमावली आहे. ज्यांनी नैतिकता गमावली, त्यांनी स्वबळावर लढण्याच्या गप्पा मारू नये. अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे.