शिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी

मुंबई : भाजप पाठोपाठ आज शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलत माजी आ ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. गायकवाड यांना गेली पाच वर्ष ‘नॉटरीचेबल राहीने महागात पडले आहे.

खा.रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून शिवसैनिकांचा विरोध होता. त्यामुळे ओमराजे अथवा शंकर बोरकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. आज अखेर सेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये खा गायकवाड यांना डावलत ओमराजेंना संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे राज्यभरातील लोकसभा उमेदवार

दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे

उत्तर पश्चिम : गजानन कीर्तीकर

Loading...

ठाणे : राजन विजारे

रायगड : अनंत गिते

Loading...

रत्नागिरी : विनायक राऊत

कोल्हापूर : संजय मंडलिक

हातकणंगले : धैर्यशील माने

नाशिक : हेमंत गोडसे

शिर्डी : सदाशिव लोखंडे

शिरूर : शिवाजीराव आढळराव पाटील

बुलडाणा : प्रतापराव जाधव

अमरावती : आनंदराव आडसूळ

यवतमाळ-वाशिम : भावना गवळी

परभणी : संजय जाधव

संभाजीनगर : चंद्रकांत खैरे

कल्याण : श्रीकांत शिंदे

मावळ : श्रीरंग बारणे

ठाणे : राजन विचारे

धाराशीव : ओमराजे निंबाळकर

हिंगोली : हेमंत पाटील

रामटेक : कृपाल तुमाने