धारावीचं श्रेय भाजपाने घेणं म्हणजे मढ्यावरच लोणी खाणं, शिवसेना नेत्याचं प्रत्युत्तर

shiv-sena-bjp-flags

मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथील कोरोना बाधितांची आकडा हा आटोक्यात आला आहे. याची दखल थेट WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने घेतल्यानंतर श्रेयवाद हा चांगलाच पेटला आहे. हा श्रेयवादाचा सामना आता शिवसेना विरुद्ध भाजपा अश्याया वळणावर येत आहे. चंद्रकांत पाटील, नितेश राणे यांच्यासोबत अनेक भाजपा नेत्यांनी हे श्रेय RSS च्या स्वयंसेवकांना जाते असे म्हणले असून यानंतर शिवसेना देखील प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाली आहे.

धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. उगीच नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे विरोधकांना महागात पडेल. अशा कठीण प्रसंगात दिवसरात्र सरकारवर टीका करायची आणि चांगल्या कामगिरीच्या श्रेयासाठी रेटून खोटं बोलायचं, ही दुटप्पी भूमिका असल्याचे शेवाळे यांनी म्हटले. तसेच, धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती असल्याची टीकाही शेवाळे यांनी केली.

अमेरिका-चीनलाही जे जमलं नाही ते रशियाने करून दाखवलं, लस चाचणी परीक्षणात ठरली यशस्वी

भाजपा नेते नितेश राणे यांनी हे राज्य सरकारचं श्रेय नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यांनी ट्विट केलं की,”राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि अन्य सेवाभावी संस्थांनी धारावीच्या अनेक भागांत दिवसरात्र काम केले. त्यांनी कोणताही गाजावाजा केला नाही. त्यांच्या मेहनतीमुळे धारावी आज कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे श्रेय हे महाराष्ट्र सरकारला देणं हे त्या संस्थांवर अन्याय करण्यासारखं आहे.”, असे नितेश राणेंनी म्हटले होते. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धारावीचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, ”आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं,” या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतूक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

‘राजस्थानात पायलट, महाराष्ट्रात पाय लट-लट’; भाजपा नेत्याने केली टीका