संपर्कप्रमुख आ.तानाजी सावंतांच्या संपर्कामुळे एकनिष्ठ शिवसैनिकांचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर ?

टीम महाराष्ट्र देशा- सोलापुर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हयातील शिवसेना संघर्ष करण्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ती त्याग, निष्ठा आणि बालिदानासाठी, त्यात साम्य हे की दोन्ही जिल्ह्यातील शिवसैनीकांनी साखर सम्राट आणि राष्ट्रवादीशी लढत दिली हे विशेष. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसैनीकांच कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या एकानिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याची चर्चा आहे. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची सुत्रे आ. तानाजी सावंत यांच्या हाती आल्यापासून तर एकनिष्ठ शिवसैनिकाचा संपर्क तुटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे वेळीच सावंताना आवरा, नाहीतर वेळ निघून गेलेली असेल असा सुर शिवसैनिकांकडून आवळला जात आहे.

जिल्ह्यात शिवसेना संपर्क प्रमुख म्हणजेच शिवसेना असे समीकरण रूढ होऊ पाहतेय यामुळे पक्षहित मोठे की संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंताची स्वामीनिष्ठा मोठी हा विषय आता चर्चीला जाऊ लागला आहे. या जिल्ह्यातुन सेनेचे एकमेव आमदार असलेले नारायण पाटील हे अडीचशे ,तीनशे मतांनी निवडुन आलेले तर तेथे ताकत वाढविण्याऐवजी तत्कालीन जिल्हाप्रमुख असलेले धनंजय डिकोळे यांचीच उचलबांगडी केल्याने देखील मोठी नाराजी वाढू लागली आहे.

शिवसेनेत कट्टरता पाहिली जाते स्व. बाळासाहेबांवरील निष्ठा आणि उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्यावरील प्रेम पाहून परंतु  जिल्ह्यामध्ये जो संपर्क प्रमुखाचा निष्ठावंत तो शिवसैनीक अशी पद्धत रूढ होऊ लागली आहे. त्यामुळे पक्ष प्रमुखांनी लक्ष दिले नाही तर खुप मोठा राजकीय भुकंप झाल्याशिवाय राहणार नाही असे राजकीय जाणकार सांगतात.

You might also like
Comments
Loading...