राजकारण विसरून सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल – खा. संजय राऊत

raut

मुंबई : ‘तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. मात्र, तिन्ही पक्ष एकजुटीनं राज्यात काम करत आहे. त्यामुळे विरोधकांना डोकेदुखी सुरू झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप चुकीचा असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

याबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘भाजपाच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्यासोबत राहिली. पण, भाजपाला सत्तेची लालची आहे. सत्तेसाठी ते आपल्या मित्र पक्षाचं बलिदान देऊ पाहत होते. त्यामुळे आज शिवसेना भाजपासोबत नाही’.

तसेच राज्यातील परिस्थिती कशी आहे, हे फडणवीसांनाही माहिती आहे. विरोधी पक्षात असल्यानं ते आरोप करत आहेत. राजकारण विसरून सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल,’ असं राऊत म्हणाले.

दरम्यान, ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं विधान खरं आहे. काँग्रेसचे मोठे नेते राज्यातील निर्णयांमध्ये सहभागी होत नाही,’ असं संजय राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.