‘चाणक्य असेही म्हणाला होता’ ; संजय राऊतांचा अमित शहांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. त्यात भाजप आणि शिवसेना यांची युती होणार कि नाही यावर अनेक तर्क वितरक लढवले जात आहेत. दरम्यान, मध्यंतरी अमित शहा यांनी उभय पक्षातील दुरी मिटवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट देखील होती.

मात्र , निवडणुका तोंडावर असताना भाजपाध्यक्ष अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. तेव्हा भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा यांनी पुण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित 12 व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानाच्या कार्यक्रमात चाणक्य यांच्यावर व्याख्यान दिले होते. त्यालाच लक्ष करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन चाणक्य असेही म्हणाला होता म्हणत एक पोस्ट केली आहे. यातून पुन्हा भाजपसोबत युती होणार नसल्याचेच स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

संजय राऊत यांनी ट्विटरवर ‘चाणक्य असेही म्हणाला होता’ असे कॅप्शन देत एक फोटो शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, नाते तोडू नये पण ज्या ठिकाणी नात्यांची किंमत ठेवली जात नाही तिथे ती निभावण्याची गरज नाही. यामध्ये त्यांनी भाजपकडून युतीबाबात होणाऱ्या चर्चा आणि अमित शहांवर नाव न घेता टीका केली आहे.

कोणीही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो; संजय राऊत यांचा मोदींना टोला

आता भाजपनं आमचा मुका घेतला तरी युती होणार नाही – संजय राऊतLoading…
Loading...