पराभवाची भीती भाजपच्या मानगुटीवर बसली आहे ‘गेट वेल सून माय फ्रेंड बीजेपी’

संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवारांना फटकारलं !

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना – भाजप एकत्र लढणार.’ असं वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलच फटकारलं आहे.

शिवसेनेने काय करायचं हा निर्णय फक्त उद्धव ठाकरे घेतील, इतर कोणी त्यात लुडबूड करु नये.’ अशा शब्दात संजय राऊत यांनी मुनगंटीवार यांना झापलं आहे.

भाजपच्या लोकांना झोपेतसुद्धा ‘सामना’ दिसतो आणि ते दचकून उठतात, पराभवाची भीती भाजपच्या मानगुटीवर बसली आहे. गेट वेल सून माय फ्रेंड बीजेपी.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर खोचक टीका केली.

तर, शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक उद्धव ठाकरे आहेत. हे सुधीर मुनंगटीवार विसरलेले दिसतात. शिवसेनेने पुढील निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत ‘एकला चलो रे’ या भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं आहे. अस देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना – भाजप एकत्रच लढणार आहे. किती ही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ . अस वक्तव्य सुधीर मुनंगटीवार यांनी विधानसभेत केल होत.

You might also like
Comments
Loading...