मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत ते पंचांग पाहूनच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil

टीम महाराष्ट्र देशा : राज्याला प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. त्यामुळे भाजप – सेनेतील अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यात शिवसेनेकडून शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील याचं देखील नाव चर्चेत आहे. तेव्हा त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा समावेश होईल का ? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खोचक उत्तर त्यांनी दिले. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण? हे त्यांच्या लक्षात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

एवढंच नाही तर आमचं श्रद्धास्थान मातोश्री आहे. तिथून जो आदेश येतो तो आम्हाला मान्य असतो मंत्रिमंडळात काय मिळणार हे माहित नाही असेही त्यांनी म्हटले आहे.