मुंबई : काल अखेर राज्याला आपला नवा मुख्यमंत्री मिळाला. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. तसेच शपथविधी सोहळ्यानंतर सर्वच स्तरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आणि त्यांचं कौतुक करत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पत्र ट्विट केलं आहे. मात्र यानंतर आता राज ठाकरे यांच्या ट्विटला शिवसेनेतुन प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत पलटवार केलाय.
ट्विट मध्ये दीपाली सय्यद म्हणाल्या कि, दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार माननीय राजसाहेब कधीतरी १ आमदारा वरून तुमचा धनुष्यबाण २ आमदारावर पोहचवुन जनतेला दाखवुन द्या कि कर्तृत्व नक्की काय असते, नाहीतर सारखी दोरी मागे ओढावी लागते हे बरे नव्हे! असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
दुसर्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार माननीय राजसाहेब कधीतरी १ आमदारा वरून तुमचा धनुष्यबाण २ आमदारावर पोहचवुन जनतेला दाखवुन द्या कि कर्तृत्व नक्की काय असते, नाहीतर सारखी दोरी मागे ओढावी लागते हे बरे नव्हे! @mnsadhikrut @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) July 1, 2022
दरम्यान, या पत्रात राज ठाकरे म्हणाले होते कि, सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो… तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन! असं म्हणत त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.
श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/2TokAB3E1F
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2022
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<