fbpx

‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू’

टीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला चांगलीच झोंबली आहे. शिवसेनेचे नेते दीपक गायकवाड यांनी, पुन्हा शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यावर टीका केली तर, तुम्हाला बेळगावच्या पुढे नेऊन सोडू, असा इशारा शेट्टी यांना उद्देशून दिला आहे.

तानाजी सावंत यांच्याविषयी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. मोहोळ येथे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी गायकवाड बोलत होते.

खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःची क्षमता ओळखून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर टीका करावी. स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणाऱ्यांनी शिवसेनेला ज्ञान शिकवू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी खासदार राजू शेट्टी यांना दिला.

यावेळी बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक महादेव गोडसे, नगरसेविका सीमा पाटील, नागेश वनकळसे, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब पवार, महेश देशमुख, रणजीत गायकवाड, प्रकाश पारवे आदींसह शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.

सचिनने किती मॅच फिक्स केल्या हे न पाहताच त्याला भारतरत्न दिलं गेलं,राजू शेट्टींची मुक्ताफळे

1 Comment

Click here to post a comment