रत्नागिरी शिवसेनेत नाराजी नाट्य कायम, भास्कर जाधवांची बैठकीला दांडी

रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरीच्या पहिल्याच दौऱ्यात रुसवे फुगवे पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव हे नाराज आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधव यांची नाराजी कायम आहे. जिल्हा नियोजन बैठकीला भास्कर जाधव यांनी दांडी मारली आहे. घरगुती कारणाने अनुपस्थित असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली आहे. मात्र, जाधवांसोबत त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधवही अनुपस्थित असल्याने त्यांची नाराजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, ‘मला पैशाचा, सत्तेचा, लाल दिव्याच्या गाडीचा मोह नाही. उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टींचे आश्वासन दिलं होतं. त्या गोष्टी जगजाहीर करायच्या नसतात. मला मंत्रिपद मिळालं नाही, पण त्यात मी कुठे कमी पडतो, असं जाधव म्हणाले होते.

Loading...

भास्कर जाधव यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादीनं त्यांना अनेक महत्त्वाची पदं दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ते मंत्रीही होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी सप्टेंबर महिन्यात त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'