गुपिते उघड कराच ; दुधवडकरांच राणेंना चॅलेन्ज

कोल्हापूर: शिवसेनेवर बोलले की प्रसिद्धी मिळते. त्यामुळे राणे सतत टीका करत असतात.त्यांच्याकडे जी काही गुपिते आहेत ती त्यांनी एकदा उघड करावीच असं चॅलेन्ज शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी नारायण राणे यांना केलं आहे . वाघ आल्याचे सांगून घाबरवणाऱ्या मेंढपाळाप्रमाणे राणेंची अवस्था झाली असल्याची देखील टीका दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत राणे यांच्यावर केली

काय म्हणाले दुधवडकर?

बारा वर्षापूर्वीं शिवसेनेचा नारायण राणे यांच्याशी संबंध संपला आहे. तरीही ते सतत शिवसेनेवर, पक्षप्रमुखांवर बोलत असतात. हा उद्योग बंद करावा, अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाही.त्यांच्याकडे जी काही गुपिते आहेत ती त्यांनी एकदा उघड करावीच .वाघ आल्याचे सांगून घाबरवणाऱ्या मेंढपाळाप्रमाणे राणेंची अवस्था झाली असून सततच्या टिकमुळे त्यांच्या पाठीशी आता जनाधार राहिलेला नाही. नवीन पक्ष काढला आहे, त्याच्या मेळाव्यांना सिंधुदुर्गातून सुरू करण्याऐवजी कोल्हापुरातून केली आहे, यातूनच सारे स्पष्ट होत आहे. इतरांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातून सुरुवात करावी. कोल्हापुरात ज्या कोरे, जानकर यांनी पक्ष काढले, त्यांची काय अवस्था आहे हे राणे यांनी पाहिले पाहिजे. त्यांनी पक्ष काढला आहे. त्यांनी त्याचे नियम बनवावेत. आमच्यावर बोलण्याचा आता प्रयत्न करू नये.’Loading…
Loading...