भाजप नेते खोटारडे ; शिवसेनेला अखेरपर्यंत झुलवत ठेवले – अनिल राठोड

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीच्या वेळी राज्याने भाजप आणि राष्ट्रवादीची अभद्र युती पहिली. मात्र त्यानंतर या युतीची संकल्पना शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यातून आता भाजप आणि शिवसेना एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.

Loading...

भाजपच्या मुंबई स्थित नेत्यांनी नगरच्या स्थानिक नेत्यांकडे तर नगरच्या स्थानिक नेत्यांनी मुंबईवाल्याकडे बोट दाखवत शिवसेनेला अखेरपर्यंत झुलवत ठेवले. अचानक दोघांनी शिवसेनेचं बोट सोडून राष्ट्रवादीचा ‘हात’ धरला. ही शिवसेनेची अन् नगरकरांची शुध्द फसवणूक आहे. मुख्यमंत्रीही खोटे बोलत आहेत अशी टीका शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केली आहे.

मी स्वत: भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत तर जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी बोलले. पण त्यांनाच आमच्याशी युती करायची नव्हती, असा पलटवार शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केला.

शिवसेनेकडून सत्तेसाठी कोणताच प्रस्ताव आला नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल जाहीर केलं, त्यावर बोलताना राठोड म्हणाले, भाजप-शिवसेनेची युती व्हावी यासाठी मी स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि सरचिटणीस आमदार सुरजितसिंग ठाकूर यांच्यासोबत तर जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी बोलले. महापौर शिवसेनेचा, उपमहापौर भाजपचा अन् इतर पद ही बैठकीत समन्वयाने ठरवू असा प्रस्ताव दिला होता. उलट त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाहीLoading…


Loading…

Loading...