शिवसेनेच्या आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विद्यमान अध्यक्ष आदेश बांदेकर आहेत.

आदेश बांदेकर हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय झाले आहेत. सध्या बांदेकर यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे. नुकत्याच झालेल्या उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीदरम्यान शिवसेनेला केंद्रात आणि राज्यात आणखी मंत्रिपदे देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानुसारच हा दर्जा दिला गेल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सायबर सुरक्षेसंदर्भात ‘सिमॅन्टेक’शी करार

शपथविधीसाठी कुमारस्वामींंचे उद्धव ठाकरेंना आमंत्रण