‘हा’ पक्ष ठरला देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष

नवी दिल्ली :  शिवसेना हा देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष ठरला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) आकडेवारीनुसार 2016-17 या आर्थिक वर्षात शिवसेनेला तब्बल 25.65 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. देशभरातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीच्या आधारावर एडीआरनं हा अहवाल तयार केला आहे.

bagdure

शिवसेनेनंतर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला 3 हजार 865 देणगीदारांकडून 24.75 कोटी रुपयांची देणग्या मिळाल्या आहेत. सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्षांच्या यादीत पंजाबमधील शिरोमणी अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पक्षाला 2016-17 या आर्थिक वर्षात 15.45 कोटी रुपयांची रक्कम देणगी स्वरुपात मिळाली आहे.

दरम्यान 2015-16 ते 2016-17 या कालावधीत आसाम गण परिषद आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या दोन पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. आसाम गण परिषदेला 2016-17 मध्ये 0.43 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ तब्बल 7 हजार 183 पट इतकी आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला 4.2 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. 2015-16 च्या तुलनेत ही वाढ 596 पट इतकी आहे.

You might also like
Comments
Loading...