‘आवई’ उठविण्यापेक्षा हिंमत असले तर मध्यावधी निवडणुका घ्या :संजय राऊत

sanjay-raut

पिंपरी:महाराष्ट्रात अधून-मधून मध्यावधी निवडणुकीची ‘आवई’ उठविली जाते. ‘आवई’ उठविण्यापेक्षा हिंमत असले तर मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. मध्यावधीला शिवसेना तयार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले. तसेच स्वबळवार लढण्याची शिवसेनेची तयारी पुर्ण झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ कायम राहणार असल्याचा विश्वासही, त्यांनी व्यक्त केला.

खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभानिहाय शिवसेना पदाधिका-यांची बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला आघाडीच्या शहरसंघटक सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, विशाल यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील जनतेचा सरकारवर रोष निर्माण झाला असून या रोषाचा उद्रेक नांदेड महापालिका निवडणुकीत झाला. नांदेडमध्ये भाजपने फोडाफोडी केली. शिवसेनेचा आमदार, नगरसेवक फोडले आहे. नांदेडच्या जनतेने भाजपच्या फोडाफोडीच्या राजकाराणाला थारा दिला नाही’आवई’ उठविण्यापेक्षा हिंमत असले तर मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. मध्यावधीला शिवसेना तयार आहे, ‘आवई’ उठविण्यापेक्षा हिंमत असले तर मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. मध्यावधीला शिवसेना तयार आहे असं सांगत राऊत यांनी भाजपला एक प्रकारे आव्हान दिलं आहे