देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, तर शिवसेना आवश्यक आहे : संभाजी भिडे

sambhaji bhide

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेना आवश्यक असल्याचं मत व्यक्त केले आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. राज्यभर औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत असतानाचा यावेळी सांगलीतील एका चौकाचं नामकरण करण्यात आलं आहे. याअनुषंगाने भिडे यांनी देशाचं नामकरण करण्याचा मुद्दा मांडला आहे.

‘आज मोठी आनंदाची गोष्ट आहे. फार विलंब झालेली चांगली गोष्ट आज होतेय. हे नामकरण २५ वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं, ते आज होतंय. जे नामकरण होतंय त्या बाळासाहेब ठाकरेंची जी आशा आकांक्षा होती की संपूर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी. चौकाचं नामकरण होईल, पण कामाचं काय? या सांगली गावात शिवसेनेच्या २००- २५० शाखा का नाहीत? हे दुःख घेऊन आपण जाऊयात. हे दुःख आपण कार्यन्वित करुयात’ असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे.

पुढे भिडे म्हणाले की, गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा पाहिजे. लोकसेवक तत्पर पाहिजे. हा प्रवाह अखंड चालू राहिल पुढे यासाठी खटपट केली पाहिजे. पद, पैसा, स्थान, मोठेपण हे शुल्लक आहे. या देशाला शिवसेना किती महत्त्वाची आहे? प्राणीमात्रांनी जीवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे, तसं या या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, भारत म्हणून नाही, तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत आहे.

महत्त्वाच्या बातम्या