हे तर कॉंग्रेसची ‘बी टीम’ ; मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : नांदेड महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या चांगलाच शिगेला पोहचल्याच दिसत आहे. काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधत ‘थापाड्यांच्या आश्वासनांना भुलू नका’ अशी टीका केली होती. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नांदेडमधील शिवसेना म्हणजे काँग्रेसची ‘बी टीम’ आहे. तसेच महापालिकेत शिवसेनेला सत्ता तर सोडा पण दोन आकडी नगरसेवकही निवडून आणता येणार नाहीत’ म्हणत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. नांदेड महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. आज या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली.

पुढे बोलताना फडणवीस यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली ‘काँग्रेस ७० वर्षे सत्तेत तरीही गरीबांना अजूनही घरे मिळू शकलेली नाहीत. अशोक चव्हाणांचे मुंबईत फ्लॅट झाले. मात्र, नांदेडच्या गरिबांना झोपडी देखील मिळाली नाही. एकट्या नांदेडमध्ये ५० हजार लोक बेघर आहेत. त्यांना नरकयातना भोगावी लागत आहे. मग हे सर्व हाल त्यांना दिसत नाहीत का असा सवाल देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.